नांदेड| दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपीस नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने जेरबंद करून त्यांच्याकडून 02 तलवार, 01 खंजर, 02 मोटार सायकल, 01 स्कुटी मोटार सायकल, मिरची पुड, दोरी, पेट्रोलअसा एकुण 1,87,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत माली गुन्हयाची माहीती काढुन केसेस करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 31/12/2024 रोजी ग्रामीणला गोपनिय माहिती मिळाल्यावरुन, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत माळटेकडी नांदेड रेल्वे स्टेशनच्या बाजुला रेल्वे पटरीजवळ रोडचे बाजुस थांबुन रस्त्याने येणारे जाणारे प्रवाशांना दरोडा टाकुन लुटण्याचे इराद्याने हत्यारे घेवुन थांबलेले आहेत अशी खात्रीशिर माहिती मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी दिनांक 31/12/2024 वेळ 17:40 वा. गुन्हे नियंत्रण पथकातील विश्वदिप रोडे पोउपनि व टिम ने पंचासह छापा कार्यवाही केली असता वर नमुद आरोपी हे एकत्र येवून, संघटित होवून रोडवरील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या इराध्याने हत्यार व इतर साहित्य घेवून दरोडा टाकण्याच्या तयारील असताना मिळुन आले आहेत.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, विश्वदीप रोडे, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पोलीस अमंलदार, पोहेकों. जाधव, पोहेकॉ. गटलेवार, पोकॉ. तेजबंद, पोकों. पंचलिंग, पोकों. माळगे, पोकों. कलंदर, पोकॉ. माने, पोकों. पवार, पोकॉ. कल्याणकर सर्व नेमणुक गुन्हे नियंत्रण पथक पो.स्टे. नांदेड ग्रामीण यांनी केली आहे.
या कारवाईत आरोपी शेख जुबरे शेख मगदुम वय 22 वर्ष, व्यवसाय बेकार रा. मिल्लतनगर नांदेड, सईदखान नासेरखान वय 19 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. खुदबेईनगर चौरस्ता नांदेड, शेख अस्लम शेख नन्हु वय 23 वर्ष, व्यवसाय बेकार रा. गल्ली न.11 इम्रान कॉलनी नांदेड याना अटक केली असून, अमजद ऊर्फ बिल्डर रा. फातेमा शाळेजवळ मिल्लतनगर नांदेड (फरार), मनु रा. इम्रान कॉलनी गल्ली नंबर 11, नांदेड (फरार) हे जण फरार असून, या कार्यवाहीत 02 तलवार, 01 खंजर, 02 मोटार सायकल, 01 स्कुटी मोटार सायकल, मिरची पुड, दोरी, पेट्रोलअसा एकुण 1,87,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलम 310 (4), 310(5), 288,111 भारतीय न्याय संहीता-2023 सह कलम 4/25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. सदर गुन्हयाचा तपास विश्वदिप रोडे, पोउपनि पो.स्टे. नांदेड ग्रामीण हे करीत आहेत.