नांदेडकरियर

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

हिमायतनगर, अनिल मादसवार| सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षा–२०२६चे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) रोजी ही परीक्षा होणार असून, आर.एन.एस. इंटरनॅशनल स्कूल, राजा भगिरथ शाळेचे मैदान, हिमायतनगर येथे स्पर्धा रंगणार आहे.

कनिष्ठ गट (इ.३री ते ७वी) आणि वरिष्ठ गट (इ.८वी ते १०वी) अशा दोन गटांत ही परीक्षा होणार आहे. दोन्ही गटांसाठी आकर्षक रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या पाच क्रमांकांसाठी हजारो रुपयांची बक्षिसे असल्याने स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानासह बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी असून, अभ्यासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. नावनोंदणीसाठी ३० रुपयांचे नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षणप्रेमी नागरिकांकडून कौतुक होत असून, तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!