नांदेड| पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाज आता आचारसंहितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहे त्याच धर्तीवर ती आज नांदेड सकल मराठा समाजातर्फे विवाह विषयक आचारसंहिता बनवण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर येथे पार पडली. सदरील बैठकीमध्येखालील प्रमाणे आचारसंहिता बनवण्यात आली.


•दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा.
•डीजे नको पारंपारिक वाद्याला पसंती द्यावी.
•प्री-वेडिंग सारखा प्रकार बंद करावा.
•मूळ पत्रिका भेटवस्तू सहित देणे टाळावे.
•हळद,साखरपुडा,लग्न एकाच दिवशी करावे.
•संगीत सेरेमनी सारखा कार्यक्रम बंद करावा.
•हळदीच्या कार्यक्रमात पारंपारिक सुसूत्रता असावी.
•लग्न वेळेवरच लावावे.

•लग्नात छत्रपती शिवरायांची आरती घेण्याच्या ऐवजी जिजाऊ वंदना घ्यावी.
•नवरा नवरीला हार घालताना उचलून घेऊन नये.
•लग्नात भेटवस्तू ऐवजी पुस्तके, झाडांची रोपे किंवा रोख रक्कम द्यावी.
•जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत.
•लग्नात नवरदेव नवरी पुढे व्यसन करून नाचणाऱ्या तरुणाईचा पाय बंद करावा.
•सासरच्या मंडळींनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये.
•सामूहिक विवाह सोहळे पंचक्रोशी व तालुका स्तरावर घ्यावेत.
•आमदारांनी आपल्या मतदारसंघात सामूहिक विवाह सोहळ्याची जबाबदारी घ्यावी.

या सर्वसह उपस्थित समाज बांधवांच्या मान्यतेने सर्वमान्य सुकाणू समिती तालुकास्तरावर स्थापन करून त्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हा प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याबाबत एक मत निर्माण झाले. नांदेड येथील सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून त्यात सदरील समितीमध्ये प्रत्येक संघटनेचे एका पदाधिकाऱ्याला स्थान देण्यात आले आहे. सदरील बैठकीत आज नांदेड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,वैद्यकीय,विधी,व्यवसाय अधिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
