नांदेडराजकीय

Congress : शुक्रवारी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली

नांदेड| महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारा विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवार दि.१३ रोजी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदीसह इतर मान्यवरांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारा बाबत सविस्तर विश्लेषण लेखाच्या माध्यमातून, लोकसभा विरोध पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमातून केले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारा विरोधात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. याच अनुषंगाने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या शुक्रवार दि.१३ रोजी खा. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच शहरात मशाल रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून मशाल रॅलीला सुरुवात होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनानंतर रॅलीचा समारोप होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे, एकनाथ मोरे, जिल्हा प्रवक्ता बापूसाहेब पाटील, शहर प्रवक्ता मन्तजिब, आदीजन उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button