HomeनांदेडNew Weekly Express : फिरोजपूर - हजूर साहिब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस...

New Weekly Express : फिरोजपूर – हजूर साहिब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस – मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट – खा. डॉ. अजीत गोपछडे

नांदेड| फिरोजपूर – हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस ही नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे दि.13 जून पासून सुरू करण्यात येत आहे.दर शुक्रवारी फिरोजपुर हून प्रस्थान करील. हीच रेल्वे दर रविवारी परतीचा प्रवास करील. दि. 15 जून रोजी हजूर साहिब येथून दुपारी 11:50 वाजता प्रस्थान करुन फिरोजपूर (पंजाब) कडे पहिला प्रवास प्रारंभ करील. या नवीन रेल्वेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्याला विकासाची नवी भेट दिली आहे . अशा शब्दात खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स. रवनीत सिंघ बिट्टू यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाच्या वतीने फिरोजपुर हुजूर साहेब नांदेड नवीन साप्ताहिक रेल्वे दि. 13 जून 2025 पासून सुरु करण्यात येत आहे. याबाबत खा. डॉ . अजित गोपछडे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमाकडे व्यक्त केली .ते म्हणाले की , या नव्या ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढेल व विकासाला नवे प्रोत्साहन मिळणार आहे.

दोन्ही राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या या नव्या साप्ताहिक ट्रेनला मंजुरी मिळाल्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांना दिल्ली व पंजाबकडे जाण्यासाठी एक नवी ट्रेन उपलब्ध झाली आहे. तसेच, सैन्य दलातील जवानांना देशाच्या सीमेपर्यंत थेट पोहोचण्यासाठी या ट्रेनचा उपयोग होईल. या ट्रेन च्या मार्गावरील संबंधित क्षेत्राला आर्थिक लाभही मिळणार आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी पंजाब आणि पटनासाहिबसाठी साप्ताहिक ट्रेनची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्य मंत्री स. रवनीत सिंघ बिट्टू यांनी विशेष लक्ष देऊन ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

फिरोजपूर – हजूर साहिब साप्ताहिक एक्सप्रेस ही नवीन रेल्वे दर शुक्रवारी फिरोजपूर जंक्शनहून श्री हजूर साहिबसाठी रवाना होईल. ही ट्रेन सुमारे 2000 किलोमीटरचा प्रवास सुमारे 38 तासांत पूर्ण करेल. ही ट्रेन फिरोजपुर कैन्ट येथून दुपारी 13:25 वाजता प्रस्थान करुन पुढे फरिदकोट, भटिंडा जं, जाखल जं, जींद जं, रोहतक जं, दिल्ली सफदरजंग, फरिदाबाद, पलवल, मथुरा जं, आग्रा कैन्ट, ग्वाल्हेर जं, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना जं, विदिशा, भोपाळ, इटारसी जं, खंडवा जं, मनमाड जं, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलु, परभणी, पूर्णा अशा प्रमुख स्थानकांवर थांबेल. पहाटे 3:30 वाजता हजूर साहिब नांदेड येथे आगमन होईल.

ही नवीन रेल्वे सेवा पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील अनेक महत्त्वाच्या धार्मिक केंद्रांना जोडून संपर्क मजबूत करेल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री स. रवनीत सिंघ बिट्टू यांचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी विशेष आभार मानले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments