नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे व माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांचे मोठे बंधू विनोद शर्मा यांचे गुरुवारी दुपारी मुंबईत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
विनोद शर्मा हे मागील काही काळापासून आजारी होते. गुरुवारी अचानक त्यांची प्रकृती गंभीर होऊन प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शुक्रवारी २५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता चंदनवाडी स्मशानभूमि, चर्नी रोड, मुंबई येथे अंतिम संस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.