आरोग्यनांदेड

primary health center : सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था झाली जीवघेणी

बिलोली/नांदेड| बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीची अवस्था जीवघेणी झाली आहे. या इमारतीला तडे गेले असून छताचा भाग अनेक ठिकाणी कोसळला आहे. हि बाब लक्षात घेता नूतन इमारत बांधकामासाठी निधी द्या. अशी मागणी सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने विश्वनाथ पाटील समन ,शंकर महाजन यानी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे.

मौजे सगरोळी हे गाव नांदेड जिल्ह्यात सगळ्यात मोठे गाव असून गावची लोकसंख्या अंदाजे 14000 एवढे आहे. मतदार संख्या 5500 आहे सगरोळी हे गाव पंचक्रोशातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे आजू बाजूच्या गावातील जनता उपचारासाठी सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. पण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सन 2022 पासून मोडकळीस आली आहे. जिल्हा परिषद विभागाचे अभियंता यांनी इमारत बाबत चौकशी केली असता ती इमारत वापरण्यायोग्य नाही. असा अहवाल जिल्हा परिषद कडे सादर केला आहे.

IMG 20250708 WA0009 primary health center : सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था झाली जीवघेणी

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका अधिकारी यांनी शासनाकडे अनेक वेळेस इमारत मोडकळीस आल्याचे व दुरुस्ती करण्याचे विनंती करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. सध्या परिस्थितीत प्राथमिक आरोग्यंद्राची एवढी बिकट परिस्थिती झाली कि, इमारतीचे काही भाग रुग्णांच्या व तेथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडले आहेत. यामुळे काही लोकांना दुखापती झाली असून, वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोकळ्या प्रांगणात असलेल्या जागेत रुग्णांची तपासणी करत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने सततच्या पावसामुळे ती इमारत पूर्णपणे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तिथे रुग्णांना तपासणीसाठी जागा नसल्यामुळे आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

IMG 20250708 WA0008 primary health center : सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था झाली जीवघेणी

त्यामुळे त्वरित नवीन इमारतीसाठी बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिवर्तन समितीच्या वतीने विश्वनाथ पा समन, शंकर महाजन यानी केली आहे. तसेच नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात संबंधित विभागास पत्राद्वारे इमारत दुरुस्तीची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार डाॅ.अजितजी गोपछडे यांनी आरोग्य आरोग्यमंत्र्यास मुंबई येथे भेट घेऊन संबंधित इमारतीची माहिती देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!