primary health center : सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था झाली जीवघेणी
बिलोली/नांदेड| बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीची अवस्था जीवघेणी झाली आहे. या इमारतीला तडे गेले असून छताचा भाग अनेक ठिकाणी कोसळला आहे. हि बाब लक्षात घेता नूतन इमारत बांधकामासाठी निधी द्या. अशी मागणी सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने विश्वनाथ पाटील समन ,शंकर महाजन यानी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे.
मौजे सगरोळी हे गाव नांदेड जिल्ह्यात सगळ्यात मोठे गाव असून गावची लोकसंख्या अंदाजे 14000 एवढे आहे. मतदार संख्या 5500 आहे सगरोळी हे गाव पंचक्रोशातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे आजू बाजूच्या गावातील जनता उपचारासाठी सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. पण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सन 2022 पासून मोडकळीस आली आहे. जिल्हा परिषद विभागाचे अभियंता यांनी इमारत बाबत चौकशी केली असता ती इमारत वापरण्यायोग्य नाही. असा अहवाल जिल...
