कृषीनांदेड

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

माहूर, राज ठाकूर | तालुक्यातील मौजे लखमापूर येथे स्वर्गीय माजी आमदार प्रदीपजी नाईक केसरी यांच्या स्मरणार्थ सलग पाचव्या वर्षी भव्य शंकरपट बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शंकरपट स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेत विजयी ठरलेल्या बैलजोडी मालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून एकूण २ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

दि. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या शंकरपटाचे आयोजन श्रीमती बेबीताई नाईक, कपिल नाईक, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, ज्योतिबा दादा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी व दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

प्रथम बक्षीस – सोपीनाथ देवस्थान, महागाव यांना ४१ हजार रुपये (ज्योतिबा दादा खराटे यांच्या हस्ते)

द्वितीय बक्षीस – कांदली (हिमायतनगर) यांना ३१ हजार रुपये

 अ गट – दगडथर येथील शिवानी राठोड यांना २१ हजार रुपये
 ड गट – दगडथर येथील शिवानी राठोड यांना ३१ हजार रुपये
 ड गट द्वितीय बक्षीस – हिवरा येथील साहेबराव पाटील कदम यांच्या बैलजोडीस २१ हजार रुपये (मेघराज जाधव यांच्या हस्ते)
 तृतीय बक्षीस – तुळशी येथील शाम राठोड यांना १५ हजार रुपये
याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इतरही अनेक बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

या शंकरपटाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप राठोड, विजय राठोड, प्रफुल्ल राठोड, जसवंत राठोड, देवा राठोड, दत्ता जाधव तसेच लखमापूर येथील शेतकरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शेतकरी व बैलगाडा शर्यतीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button