उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता . कंधार येथील जि. प प्राथमिक शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार चालू असून शाळेचे शिक्षक राठोड यांच्या स्कुटीला चक्क शाळेची विज वापरून शहरातील घराचे बिल बचत करून आपल्या स्कुटीला चार्जिंग वर्गा समोरच लावून घेतात .जर चार्जिंग फुल होऊन स्फोट झाला तर याला जबाबदार कोण ? अशी चर्चा शिराढोण परिसरात सुज्ञ पालकांमधून होताना दिसून येत आहे.
शाळा हे विद्येचे मंदिर आहे , येथे गावातील लहान लहान मुलांना संस्काराचे धडे दिले जातात , शाळेमध्ये विद्यादानाचे काम केल्या जाते . शिक्षकाच्या हातून विद्यार्थी घडत असतो. पूर्वीच्या काळी गुरुजींना फार मोठे स्थान होते . महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळेचे दार उघडे करून सर्वांना शिक्षण देण्याचे पवित्र काम समाजामध्ये केल्या जाते. पण आजचे शिक्षक हे आपल्या स्वार्थासाठी नोकरी करतात की काय अशी परिसरात चर्चा होताना दिसत आहे.
नुकत्याच शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेतील हौशी शिक्षकाने चक्क शाळेतच कुठला चार्जिंग लावताना फोटो सोशल मीडियावर फिरताना दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार्जिंग फुल होऊन जर स्पोर्ट झाला तर याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न सध्या सुज्ञ पालकांना पडला आहे. शाळेचे शिक्षक शाळेत तर येतात. परंतु त्यांचं विद्यार्थांना शिकवण्यापेक्षा त्यांची इलेक्ट्रिकल मोटार सायकल ही चार्जे कशी होईल याकडे जास्त लक्ष असल्याचे पालक वर्गातून ऐकवयास येत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाऐवजी शासनाच्या वीज बिलावर गाडी चार्जे करून स्वतःच्या बचतीकडे लक्ष देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शासनाच्या ठरवून दिलेल्या अनेक निकशातून शिराढोण येथील जि. प प्राथमिक शाळा जवळपास सहा महिन्यांपासून बाद झाली असल्याचे बोलल्या जात आहे. तत्कालीन केंद्रप्रमुख जयवंत काळे यांनी शाळेला एक जणू डिजिटल बनवण्याचा ध्यास घेतला होता.परंतु त्यानंतर आजतागायत शाळेत कुठलीही व्यवस्था ही सुरळीत नाही. शासन म्हणते मुख्यालयी राहा परंतु येथील शिक्षक हे मुख्यालयी न राहता आपल्या सोयीनुसार ये -जा करतात. आणि आल्यानंतर ज्या ठिकाणी चिमुकले विद्यार्थी -विद्यार्थिनी ज्ञानार्जन करतात त्याच ठिकाणी येथील शिक्षक आपली स्वतःची इलेलक्ट्रीकल मोटार सायकल व्ह-हाडयात पार्किंग करत असल्याचे फोटो सोशिअल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
या चार्जिंगमूळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे लक्ष देतील काय ? व या मुजोर शिक्षकांवर कार्यवाही करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या गावातील घर भाड्यासह आता चार्जिंगचेही बिल मागत आहे की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.