नांदेडलाइफस्टाइल

Justice R.R. Patki : स्त्रीचे सौंदर्य तिच्या व्यक्तिमत्वात – न्यायमूर्ती आर आर पत्की

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महिलांमधील पुरुषप्रधान मानसिकता बदलणे महत्त्वाचे असून स्त्रीचे सौंदर्य तिच्या दिसण्यात नसून व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा भूमी अभिलेख विभागाचा महिला कर्मचारी सन्मान सोहळ्यात माहूरचे न्यायमूर्ती आर.आर. पत्की यांनी केले.दि.१८ रोजी माहूर येथे भूमी अभिलेख विभागातील जिल्हाभरातील महिला कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय स्थानावरून माहूर न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.आर.पत्की बोलत होते.

नांदेड जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडून नारीशक्ती महिला सन्मान सोहळ्याचे भूमी अभिलेख कार्यालय माहूर तर्फे आयोजन करण्यात आले होते.आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती पत्की म्हणाले,की स्त्रीचे सौंदर्य तिच्या दिसण्यात नसून तिच्या स्वभावात आणि तिच्या व्यक्तिमत्वात आहे.सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना शिवाय शासकीय सेवा देतांना स्वत्वला जपा,स्वतःमध्ये कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करून नकारात्मक मानसिकता बदलता येत असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती पत्की यांनी केले.

IMG 20250319 WA0017 Justice R.R. Patki : स्त्रीचे सौंदर्य तिच्या व्यक्तिमत्वात - न्यायमूर्ती आर आर पत्की

माहूर शहरातील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत आयोजीत जिल्हास्तरीय महिला सन्मान मिळाव्याचे प्रस्ताविक नांदेडच्या जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख सीमा देशमुख यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सबुरी डोगळीकर,बार कौन्सिलचे तालुकाध्यक्ष श्री.ढगे यांची समायोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माहूर किनवटचे तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख राम सिद्धमवार व त्यांच्या अधिनिस्थ कर्मचाऱ्यांनी केले होते.माहूर कार्यालयाचे माधव कदम,किनवटचे एन.के.चचाने, ए.एन.मुनेश्र्वर यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गंगासागर यांनी केले.

सुंदर दिसण्यापेक्षा असण्यावर भर द्या-सीमा देशमुख
सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या भूमिका आत्मविश्वासाने पार पाडून नेटाने समोर जाण्याची शक्ती ही महिलांमध्ये असते, तीच खरी नारीशक्ती असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सीमा देशमुख यांनी केले. स्त्रीत्वाचा महत्व पटवून देताना देशमुख ह्या म्हणाले की, सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असण्यावर भर द्या, जबाबदारीचा भार खऱ्या अर्थाने स्त्रियांवर येत असतो कारण त्यातून मार्गक्रमण करण्याची शक्ती निसर्गाने त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आहे अशा त्या म्हणाल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!