HomeनांदेडFour youths died after drowning in the quarry : खदानीत बुडून चार...

Four youths died after drowning in the quarry : खदानीत बुडून चार तरुणाचा मृत्यू ; लोहा तालुक्यातील झरी येथील घटना – NNL

नांदेड, दत्ता शिराणे| नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे झरी येथे एका खदानीत बुडून चार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना दि. ६ मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील पाच तरुण हे सकाळी लोहा तालुक्यातील झरी येथील एका खदानीवर पोहण्यासाठी गेले होते. यातील चार जन पाण्यात उतरले. आणी एकजण मात्र बाहेर थांबला होता. पोहता येत नसल्याने व तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने शेख फुज्जाइल, काजी मुज्जमील, आफान, सय्यद सिद्दीकी हे १८ ते २० वयोगटातील तरूण या चार जनांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मोहम्मद फैजान हा एक जन पाण्याबाहेर असल्याने तो वाचला आहे.

IMG 20240806 175314 Four youths died after drowning in the quarry : खदानीत बुडून चार तरुणाचा मृत्यू ; लोहा तालुक्यातील झरी येथील घटना - NNL

घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उप अधिक्षक सुशीलकुमार नायक, सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, घटनास्थळी पोहचले. दरम्यान नांदेड येथील गोदावरी जीव रक्षक दलाचे कर्मचारी सय्यद नूर, शेख हबीब, शेख सलीम, सय्यद वखार, कालिदास खिल्लारे, यांनी खदानी मध्ये उतरून मयत चार युवकाचे प्रेत पाण्याबाहेर काढले. हि घटना सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सोनखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments