On the occasion of Ashadhi Ekadash | आषाढी एकादशी निमित्त कच्छवेज् गुरुकुल स्कूलने काढली दिंडी – NNL

नांदेड| महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जूनी असून भक्ताची श्रद्धा या वारीशी जूळलेली आहे. खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात सर्वजण सहभागी होतात.

या माध्यमातून वारकारी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्त्व विशद केले जाते यांच संप्रदायिक वारीचा क्षणाचा एक अनुभव म्हणून नविन नांदेड परिसरातील कच्छवेज् गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विषयी जनजागृती केली. वृक्षरोपण करून इतरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणजेच वारकरी, यासह पायी दिंडीतून जनजागृतीद्वारे विद्यार्थी मनावर संप्रदायीक बाबी प्रतिबिंबित करण्याचे कार्य दिंडी सोहळ्यातून कच्छवेज् गुरुकुल स्कूलने राबविले. यावेळी संस्थाचालक श्री बालासाहेब कच्छवे,मुख्याध्यापिका सौ. दुर्गादेवी सोरेकर -कच्छवे, उपमुख्यध्यापक श्री सचिन वसरणीकर, प्रशांत बारादे, आबासाहेब शिशोदिया,मीरा बाचेवाड,भाग्यश्री तेहरा, शिल्पा कतेवार, शिला अनंतवार, उषा किनकर, सीमा मुरकुटे, हरज्योत कौर,सुनीता सावते व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button