बिलोली/नांदेड| जिल्ह्यातील बिलोली येथील नगर परिषदेच्या जुना बस स्थानक परिसरातील जुन्या इमारतीसमोर हुतात्मा स्तंभ होते.. राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ असलेले कचऱ्याच्या ठिकाणी टाकण्यात आल्यामुळे शहर आणि तालुक्यात तसेच मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनीही याबाबत सखोल चौकशी करून योग्य ते कार्य करण्याच्या बाबत संबंधितांना सूचना करणार असल्याचे सांगितले. दरम्यान उपजिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेची स्वतंत्र बैठक घेऊन याबाबत योग्य त्या सूचना केल्या. याकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे (Take action against those who defy the National Symbol Martyr Pillar in front of Biloli Municipal Corporation) अशी मागणी बिलोली येथील ज्येष्ठ नागरिकांची सेवाभावी संघटना आणि नवरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

बिलोली नगर परिषदेचे नवीन इमारतीत स्थालांतर होताच राष्ट्रीय चिन्ह असलेले अशोक चक्र आणि हुतात्मा स्थंभाचेचे सन्मानाने नव्या इमारतीत स्थापना होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता जुन्या न. पा चे नव्या इमारतीत स्थालांतर होताच येथील हुतात्मा स्तंभाची नगर परिषदेकडून अवहेलना झाल्याचे पहावयास मिळाले होते. कचऱ्याच्या ठिकाणी टाकण्यात आलेले राष्ट्रीय चिन्हाचे स्तंभ आणि हुतात्म्यांच्या नावांची तोडफोड याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या मराठवाड्यातील अनेक समाजसेवकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या शहरासह तालुक्यातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

याबाबत मराठवाड्यातील ज्येष्ठ समाजसेवकांनी 2 मार्च रोजी उपोषण करण्याची चेतावणी दिली. राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या प्रकरणात संबंधितांना योग्य त्या सूचना करणार असल्याचे सांगितले होते. परिस्थितीचे गांभीरे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांना सूचना केल्या होत्या. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेचे स्वतंत्र बैठक घेऊन हा संवेदनशील प्रश्न व्यवस्थित हाताळण्याविषयी सूचना केल्या. नवरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांचे भेट घेऊन स्वतंत्रपणे निवेदन दिले आहे.

दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या बिलोली बिलोली तालुक्याचा मोठा इतीहास आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही रझाकारांच्या जुलमी राजवटीत असलेल्या मराठवाड्याला निजामांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या पासून ते मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती लढा अशा अनेक लढ्यात येथील हुतात्म्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. अशाच हुतात्म्यांच्या सन्मानार्थ बिलोली शहरातील जुन्या नगर परिषद इमारतीसमोर हुतात्मा स्तंभाची उभारणी करण्यात आली होती.

कालांतराने जुन्या नगर परिषदेची इमारत जिन्र झाल्यामुळे काही वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर नगर परिषदेची भव्य अशी नवीन इमारत उभारण्यात येऊन नव्या इमारतीत नगर परिषदेचा कारभारही सुरू झाला. मात्र ज्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपणास स्वातंत्र्य मिळाले त्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाची सन्मानपूर्वक नव्या ठिकाणी उभारणी करणे अपेक्षित होते. पण नगर परिषदेच्या वतीने हुतात्मा स्तंभाची नव्या ठिकाणी उभारणी तर सोडाच पण या स्थंभाची काळजी घेणे ही जमले नाही.

आज घडीला सदरचे हुतात्मा स्थंभ जुन्या नगर परिषद इमारत परिसरातच अगदी कच-याच्या ढिगा-यात असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची दखल घेत नवरत्न सेवाभावी संस्थेच्या वतीने बिलोली नगर परिषदेच्या प्रशासक तथा बिलोली उप विभागाच्या उप विभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची भेट घेऊन सदर हुतात्मा स्तंभाच्या देखभालीसाठी हायगाय करून या स्थंभाची अवहेलना करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करत. या स्थंभाची पुन्हा सन्मानपूर्वक उभारणी करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.