नांदेडकृषी

agricultural mechanization : शेतकऱ्यांनी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड| राज्य शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याला एकूण 49 कोटी 24 लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त आहे. तरी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी 12 कोटी 31 लाख, पावर टिलरसाठी 4 कोटी 92 लाख, ट्रॅक्टर चलीत औजारे 14 कोटी 77 लाख, मनुष्य चलीत व बैल चलीत औजारे 98 लाख 48 हजार, स्वयंचलित औजारे 3 कोटी 44 लाख, पिक संरक्षण औजारे 2 कोटी 46 लाख, फलोत्पादन, काढणी पश्चात व प्रक्रिया यंत्रे 2 कोटी 95 लाख आणि कृषी औजारे बँकसाठी 7 कोटी 38 लाख असे एकूण 49 कोटी 24 लाख रुपयाचे लक्षांक प्राप्त आहे.

या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे, यंत्रसामुग्री व यांत्रिकीकरण सुविधांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी www.mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेत प्रथम अर्ज प्रथम लाभ या तत्वानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. शेतकऱ्यांनी अर्ज करताना फार्मर आयडी, आधारकार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करावीत असे कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button