Guru Purnima : विश्वकर्मा संगीत विद्यालय येथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली

नांदेड| सखोजी नगर येथील विश्वकर्मा संगीत विद्यालय येथे काल गुरु पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.दामोदर गुरुजी यांच्या वतीने व विद्यालयात संगीताचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमांचे सुंदर आयोजन केले होते.

सर्वप्रथम दीप प्रज्वलन व गणेश वंदना ,श्री संत मन्मथ स्वामी महाराज,श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी संगीत विद्यालयाचे संचालक तथा संगीत शिक्षक ह.भ.प.दामोदर गुरुजी यांचा आदरयुक्त सत्कार करून गुरु पूजन करण्यात आले. शास्त्रीय संगीत शिक्षिका कु. मुक्ता अनेराव,मृदंग शिक्षक प्रदीप अनेराव यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी अनेक अभंग आणि सुगम संगीत तथा शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रिय सचिव प्रवक्ते वैजनाथ स्वामी व वसुंधरा प्रेमी वृक्षमित्र संतोष मुगटकर हे उपस्थित होते. यावेळी अल्पोहार व फराळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button