Mp ashok chavhan ; संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण -NNL

नांदेड। संसदेच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातूनल खा. प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश आहे.

संसदीय संकेतानुसार लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्यक्षपदी काँग्रेसचे खा. के.सी. वेणुगोपाल यांची वर्णी लागली आहे. या समितीत लोकसभेतून १५ तर राज्यसभेत ७ खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये लोकसभेचे टी.आर. बालू, डॉ. निशिकांत दुबे, जगदंबिका पाल, जय प्रकाश, रविशंकर प्रसाद, सी.एम. रमेश, एम. श्रीनिवासुलु रेड्डी, प्रो. सौगत रॉय, अपराजिता सारंगी, डॉ. अमर सिंह, तेजस्वी सूर्या, अनुराग सिंग ठाकूर, बालशौरी वल्लभनेनी, के.सी. वेणुगोपाल, धर्मेंद्र यादव तर राज्यसभेतून अशोक चव्हाण, शक्तीसिंह गोहिल, डॉ. के. लक्ष्मण, प्रफुल्ल पटेल, सुखेंदू शेखर राय, तिरुची शिवा, सुधांशू त्रिवेदी यांची नावे आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button