
नांदेड l हातवारे व चेहऱ्यावर वेगवेगळे भाव मनातल्या मनात शालेय जीवनातील आठवणी.एकमेकाच्या फार वर्षानंतर गाठीभेटी ४०वर्षापूर्वी शिकत असलेल्या “अबोल”भावविश्वात रममाण झालेले वर्गमित्र त्यातच ख्याली खुशाली अन सुख दुःखावर हळुवार फुंकर घालत हे माजी विद्यार्थी ज्या शाळेत घडले “त्या मालपाणी”मूकबधिर शाळेच्या मुख्याध्यापक- शिक्षक ,व्यवस्थापनाच्या उपस्थितीत आपल्या “मूकबधिर “भाषेत जीवनाच्या आठवणी व्यक्त करत होते .या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा “बोलक्याच्या “


राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या मगनपूरा

नांदेडश्री. रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयात मूकबधिर माजी विद्यार्थी संघाचा १९८२ ते २०२० या ३८ वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.



उद्घाटन भाजपा महिला मोर्चाच्या . पुनमताई राजेश पवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटी चे पदाधिकारी . विजय मालपाणी, डॉ लक्ष्मणकांत बजाज , कुणाल विजय मालपाणी , बद्रीनारायण मंत्री व आलेले माजी कर्मचारी यांच्या हस्ते झाले.

या मेळाव्यास जवळपास ३०० माजी विद्यार्थी व २० माजी कर्मचारी सहभागी झाले होते. आलेल्या सुशिक्षित बेरोजगार माजी विद्यार्थी यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले तसेच माजी अविवाहित विद्यार्थी यांचे ही रजिस्ट्रेशन करण्यात आले. जेणेकरून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी व विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी यांनी बनवलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मूकबधिर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्षा अरूणा कुरूम, उपाध्यक्ष अभय कौलासकर, विद्यासागर पिलगुंडे, सचिव सतीश मरकुंदे, सहसचिव जयवंत हटकर, कोषाध्यक्ष श्री. महेश पंतगे, सहकोषाध्यक्ष . चंद्रकांत धुमाळ, सदस्य . उमाकांत आडे, श्री. शंकर पिलगुंडे, . अमोल लोमटे, . नोविद अब्दुल, . महेंद्र सोनकांबळे, मानसिंग टोमके, समीउल्लाखान अन्सरखान पठाण, सदस्या आशा आय. रावणगावे, . तृप्ती पी. पंतगे द्विभाषिक समन्वय मार्गदर्शक .संजय शिंदे (वसतिगृह अधीक्षक)यांनी समन्वयक व मार्गदर्शक करुन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
मूकबधिर माजी विद्यार्थी ३८ वर्षापूर्वी या शाळेत शिकत होते .बोलक्या विद्यार्थ्यां पेक्षा या अबोल विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळेच.अनेक वर्षा नंतर एकत्रित असलेले हे वर्गमित्र हातवारे करून एकमेकांची ख्याली खुशाली घेत होते. सुख दुःख अन जुन्या आठवणीत हे सगळे वर्गमित्र अबोलपणे रममाण झाले होते या मेळाव्यात आजी माजी व
शिक्षक वगळता मान्यवर व बोलके यांच्यासाठी हे सगळं नवीन होते
माजी.प्राचार्य. कृष्णा नागाचार्य पुराणिक , .संजय शिंदे (वसतिगृह अधिक्षक,). रविचंद्र नरहरी जगताप मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सूर्यकांतराव निर्मल सेवानिवृत्त मुख्याध्यापक , राम नागाचार्य पुराणिक मुख्याध्यापक, बाबुराव शंकरराव इंगोले कला शिक्षक,. विलासिनी अरविंद टेकाळे, विशेष शिक्षिका, श्रीमती आशा नागोराव देशपांडे विशेष शिक्षिका, राजेश रामजी सोनाळे कला शिक्षक, मंगला रमेश कुलकर्णी विशेष शिक्षिका, . सुनिता रत्नाकर नांदेडकर, विशेष शिक्षिका, राजगोपाल मांगीलाल पल्लोड लेखापाल, रत्नाकर नांदेडकर लिपीक, सुरेश लिगंय्या दुंपलवार काळजीवाहक, श्रीमती छबाबाई किशनलाल अग्रवाल,श्रीमती गंगाबाई नारायण चिंचोलकर स्वंयपाकी, श्रीमती गंगाबाई श्यामराव गायकवाड मदतनिस, सुशिलाबाई डेव्हीड केनडे, गुणवंत निरंजनअप्पा मंठोळे काळजीवाहक, चंद्रकांत थोराजी गोडबोले काळजीवाहक यांचा गौरव करण्यात आला.
या माजी विद्यार्थ्यांनी त्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना ऋणनिर्देश सन्मान पत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले. या मेळाव्याला पारस पोकर्णा, शाळेतील शिक्षक साईनाथ इप्तेकर यांनी मदत केली निखिल किरवले यांनी इंटरपिटर चे काम केले.



