Kinwat Undernutrition | निचपुर येथील 15 वित्त आयोगासह ईतर योजनेची माहिती न मिळाल्यामुळे उपसरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांचा उपोषण -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील निचपूर येथील उपसरपंच बालाजी डोईफोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 9 जुलै मंगळवारी रोजी किनवट येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

सन 20-22 ते 2024 या काळातील पंधरावा वित्त आयोग तांडा वस्ती सुधार योजना दलित वस्ती सुधार योजना व पेसा सुधार योजना यासह इतर योजनेअंतर्गत करण्यात आलेली विविध विकासाचे कामे व त्यावरील करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील वर माहिती सतत ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी मागून सुद्धा माहिती न दिल्याने दिनांक 24 जुलै रोजी गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे लेखी निवेदन केले होते. पण निवेदन करूनसुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान सदर माहिती न मिळाल्यामुळे आपणास दिनांक 24 जुलै रोजी लेखी माहिती कळविलेली नाही म्हणून आम्ही उपसरपंच बालाजी डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर अंकुरवाड, आडेलू घोगेवाड, व्यंकट डोईफोडे, सतीश कांगणे, बळीराज कांगणे यांनी शेवटी दिनांक 9 जुलै रोजी किनवट येथील पंचायत समिती समोर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. दरम्यान त्वरित माहिती देऊन दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा ही सदरील उपोषणकर्त्यांनी दिला असुन उपोषणाचा दुसरा दिवस असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button