Kinwat Undernutrition | निचपुर येथील 15 वित्त आयोगासह ईतर योजनेची माहिती न मिळाल्यामुळे उपसरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांचा उपोषण -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील निचपूर येथील उपसरपंच बालाजी डोईफोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 9 जुलै मंगळवारी रोजी किनवट येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
सन 20-22 ते 2024 या काळातील पंधरावा वित्त आयोग तांडा वस्ती सुधार योजना दलित वस्ती सुधार योजना व पेसा सुधार योजना यासह इतर योजनेअंतर्गत करण्यात आलेली विविध विकासाचे कामे व त्यावरील करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील वर माहिती सतत ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी मागून सुद्धा माहिती न दिल्याने दिनांक 24 जुलै रोजी गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे लेखी निवेदन केले होते. पण निवेदन करूनसुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान सदर माहिती न मिळाल्यामुळे आपणास दिनांक 24 जुलै रोजी लेखी माहिती कळविलेली नाही म्हणून आम्ही उपसरपंच बालाजी डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्...
