Tamsa District Council High School : तामसा जिल्हा परिषद हायस्कूलला सीएसआर फंडातून महत्वपूर्ण शैक्षणिक साहित्याची भेट -NNL

नांदेड| तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला सीएसआर फंडामधून विविध शैक्षणिक वस्तू मिळाल्या आहेत. एसबीआय बँकेने 250 ड्युल डेक्स, 10 डायस, 5 कपाटे आणि 5 क्लास रूम टेबल दिले आहेत. या शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी हे साहित्य देण्यात आले आहे. याशिवाय, जिल्हा परिषद वित्त विभागाने संगणक कक्षासाठी 50 खुर्च्या दिल्या आहेत.



यापूर्वी देखील लोकसहभागामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा आणि अंगणवाडी डिजिटल बनल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि शैक्षणिक साहित्याच्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधांचा लाभ होण्यास मदत होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केले.

तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला सीएसआर फंडाद्वारे प्राप्त झालेल्या वस्तू हे एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे शाळेतील शिक्षणाच्या वातावरणात सकारात्मक बदल घडवला जाईल. या शाळेतील दीड हजार विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक संसाधनांचा लाभ होईल, ज्यामुळे त्यांची शिकण्याची गुणवत्ता आणि सुविधा सुधारेल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल म्हणाल्या. पुढील काळातही स्वयंसेवी संस्था, कंपन्या, बँका आणि व्यक्तींनी शाळा व अंगणवाडयांना शैक्षणिक साहित्य पुरवावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकरी मीलन करनवाल यांनी केले आहे.





