Homeछत्रपती संभाजीनगरapply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना...

apply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन – NNL

छत्रपती संभाजीनगर | उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. अमृत संस्थेकडून इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार असून इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार.

कोणत्याही शासकीय विभाग संस्था, महामंडळ यांच्या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकतील १८ ते ४० वयोगटातील पात्रताधारक युवक-युवती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत १५ निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच ३० अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जाईल. १० वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय.,पदवीका, पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात. इच्छूक उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे.

योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दीपक जगताप ९६७३७१४१७०, अनिकेत देशमुख ९६६५१६२४४१ किंवा आनंद निकाळजे ९३२५४८७०७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments