apply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन – NNL
छत्रपती संभाजीनगर | उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. अमृत संस्थेकडून इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार असून इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च...
