HomeकृषीKrishik app : खतांची उपलब्धता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा -...

Krishik app : खतांची उपलब्धता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा – कृषि विभाग

नांदेड| खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळया प्रकारची खते बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही यासाठी कृषिक ॲप महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील दुकानात कोणत्या खताचा साठी किती आहे हे या ॲपच्या माध्यमातून कळणार आहे. तरी या ॲपचा उपयोग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत यांनी केले आहे.

कृषिक ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील पध्दतीचा अवलंब करावा. प्ले स्टोअरवर जाऊन कृषिक ॲप सुरुवातीला डाऊनलोड करावे व त्यात चावडी या फोल्डर वर जाऊन खत उपलब्धतता या फोल्डरवर जाऊन क्लीक करावे. त्यानंतर जिल्हा व तालुका निवडावा त्यानंतर सर्व दुकानातील यादी व मोबाईल नंबर, कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे व ते किती प्रमाणात त्या दुकानात उपलब्ध आहे हे कळण्यास मदत होईल. या ॲपचा उपयोग सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा, जेणेकरुन आपल्या तालुक्यात किती खत कोणत्या दुकानात उपलब्ध आहे हे कळण्यास मदत होईल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments