क्राईमनांदेड

Strike action in Nanded Assembly : नांदेड विधानसभा मतदार संघात धडक कारवाई; आतापर्यंत 24 लाखांचा ऐवज जप्त -NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत 24 लक्ष रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील काही दिवस आणखी सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने फिरते पथक व स्थिर निगराणी पथक तैनात केली आहेत.

या पथकामार्फत काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप,रोख रक्कम,अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येवून एकूण 24 लाख 4 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यात भोकर 1 लाख 70 हजार 30 रुपये, देगलूर 2 लाख 77 हजार 650, हदगाव 26 हजार 900, किनवट 1 लाख 71 हजार 725, लोहा 44 हजार 100, मुखेड 71 हजार 140, नायगाव 3 लाख 10 हजार 980, नांदेड उत्तर 12 लाख 35 हजार 380, नांदेड दक्षिण 97 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button