HomeनांदेडYouth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क...

Youth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून देवसरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा युवा नेते माधवराव पाटील देवसरकर यांनी केला. हिमायतनगर तालुक्यातील धानोरा, वारंग, टाकळी या गावांमध्ये भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने या भागात अतिवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आणि शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालवणेही कठीण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

IMG 20240903 WA0127 Youth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून देवसरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली -NNL

या गंभीर परिस्थितीत स्थानिक आमदारांनी अद्यापपर्यंत या गावांना भेट दिलेली नाही किंवा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की, त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे आणि तातडीने मदतीसाठी पुढाकार घ्यावा. तसेच सरकारने या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित लक्ष देऊन नुकसान भरपाईसाठी आणि पुनर्वसनासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

IMG 20240903 WA0125 Youth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून देवसरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली -NNL

तालुक्यातील अतवृष्टीग्रस्त भागाला आज माधवराव पाटील देवसरकर यांनी भेट देऊन या गावांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तत्काळ कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून या भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी केली आहे. स्वराज्य पक्षाचा हा पाहणी दौरा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचे पाऊल ठरेल शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे देवसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments