करियरनांदेड

Prohibitory orders : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड| येत्या जून-जुलै मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेतील गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यातील 18 परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमीत केला आहे.

या परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै 2025 या कालावधीत (सुट्टीचे दिवस व रविवार वगळून) सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी, परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.

परीक्षा कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिस कॅलक्यूलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटर पर्यंत परिसरात वापरण्यास, जवळ बाळगण्यास, परीक्षा केंद्रात नेण्यास प्रतिबंध केले आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास याआदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जूनचे 6 वाजेपासून ते 19 जुलै 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त जागा, ज्याची चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जूलै 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!