करियरनांदेड

Bike trolley experiment : पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या गोदाकाठच्या गुंज शाळेतील गुरुजीचा बाईक ट्रॉलीचा प्रयोग

लोहा l जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा कारणाने शाळा बंद होणार ही भीती ग्रामस्थांना वाटत असते .अशीच अवस्था गोदाकाठी असलेल्या पालम तालुक्यातील गुंज या गावाची झाली होती .गाव उठले आणि दोन ठिकाणी जाऊन बसले.,पण शाळा जुन्याच गावात राहिली.पण विद्यार्थी मात्र अन्यत्र जाऊ लागले.पटसंख्या अभावी शाळा बंद पडणार अशी परिस्थिती उदभवली पण उपक्रमशील शिक्षक लोह्याचे भूमिपुत्र सुनील राऊत त्याचे सहकारी रुस्तुम लोखंडे यांनी ग्रामस्थानच्या मदतीने जुगाड करत बाईक ट्रॉली आणली आणि दररोज विस्तारीत गावातून विद्यार्थी ने -आण करत आहेत. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून हा व्हिडिओ व्हायरल झाला. ग्रामस्थ व गुरुजींच्या इच्छाशक्तीतून गावातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली

पालम (जि परभणी, ) तालुक्यातील गुंज हे गाव गोदावरी नदी काठी आहे. कडेला वसलेलं हे गाव सधन बारमाही ओलिताखाली आलेलं . जुन्या गावातून अनेक कुटुंब दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली तेही दोन वेगवेगळ्या भागात त्यामुळे एका गावाचे तीन गाव झाली (लोहा तालुक्यातील बेटसांगवी सारखी) ,परंतु शाळा म जुन्या गावात राहिली. वरच्या गावात शाळा नेण्याची अनेकदा प्रयत्न झाले परंतु सरकारी काम अनेक वर्षे थांब असा अनुभव गुंज वासीयांना आला शाळा स्थलांतर होण्यास यश आलं नाही.

या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक रुस्तुम लोखंडे व लोह्याचे भूमिपुत्र शिक्षक सुनील राऊत या दोघांनी या शाळेची शैक्षणिक गुणवता आलेख वाढविण्यासाठी गावातील .पालकांशी, सातत्याने संवाद विचारविनिमय करत असत शाळा लांब झाल्याने दोन्ही स्थलांतरित गावातून विद्यार्थ्यांना ये ,-जा करण्यासाठी अडचण होत असते शिवाय पालकांना अंतर जास्तीचे वाटू लागले अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी होत असलेल्या अडचणीतुन मार्ग काढण्यासाठी राऊत गुरुजी व व लोखंडे गुरुजी प्रयत्न करत पण प पदरी अपयशच यायचे गेल्या वर्षी पहिलीसाठी प्रवेशपात्र विद्यार्थी तीन होते.

तीन पैकी एकाच विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला जाण्या येण्याच्या त्रासामुळे दोन मुलं इंग्लिश स्कूल ला गेली. पटसंख्या घटू लागली आणि चिंता वाढली .गुरुजी काही तरी करा असे गावकरी म्हणायचे.. यावर्षी प्रवेशपात्र विद्यार्थी सात सात त्या पैकी दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व पाच विद्यार्थी “ये-जा” हीच अडचण सांगून इंग्लिश स्कूल ला जाऊ लागली.

गावात बहुतांश शेतकरी व असल्याने मुलांना आणून सोडणे आणि घेऊन जाणे पालकांना त्रासदायक होऊ लागले. शिक्षकांनी बरीच महिने मोटारसायकल वर मुलांना घरी ते शाळा ने आण केली. तरीही बरीच मुलं पायी जायची. गोदावरीचा काठ शिवाय बारमाही सिचन, ऊस क्षेत्र अधिक त्यामुळे पायी जाणे हे धोक्याचे शिवाय विचूकिडाची पालकांना भीती वाटायची आता काहीतरी केलं पाहिजे ही भावना या दोन्ही शिक्षकांना वाटत असे यावर काहीतरी मार्ग निघतो काय ।(?) शोधाशोध सुरू केली. गुंज गावची शाळा पटसंख्या अभावी कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही असा निर्धार या शिक्षकांनी घेतला.

उपाय शोधण्यासाठी सोशल मीडियावर शोधाशोध सुरू केली आणि एक पर्याय सापडला. ९ जुलै रोजी शाळेत पालक सभेचे आयोजन केले. राऊत व लोखंडे या उपक्रमशील गुरुजींनी ग्रामस्थासमोर बाईक ट्रॉलीचा पल आणि दुसरा गावातुन ऑटोरिक्षा भाडे देऊन महिनेवारी लावणे हे दोन पर्याय त्यांनी ठेवले. गावातील ऑटो चालकांनी प्रति महिना सहा हजार रुपये लागतील असे सांगितले, ही खर्चिक बाब परवडणारी नव्हती त्यामुळे सोशल मीडियावर सापडलेला बाईक ट्रॉली चा पर्याय पालकांनी व गावातील गावकऱ्यांनी निवडला..

बाईक ट्रॉली गुजरात राज्यामध्ये मिळते त्याशी संपर्क केला त्यासाठी 40 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. गावातील जागरूक नागरिक पालक प्रतिष्ठित , शिक्षण प्रेमी व शिक्षक यांनी मिळून चाळीस हजार रुपयाची लोक वर्गणी जमा केली, आणि बाईक ट्रॉली खरेदी केली. मागील आठवड्यात बाईक ट्रॉली आली गावात येताच, पालकात,मुलांमध्ये पर्यायी गावात आनंदाचे वातावरण पसरले. विद्यार्थ्यांची शाळेला येजा करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली.

त्यामुळे इंग्लिश स्कूल ला जाणारी सर्व मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झाली गेल्या वर्षी 26 असलेला पट यावर्षी 34 झाला. गुरुजींच्या इच्छाशक्ती असेल तरपटसंख्या अभावी शाळा बंद पडणार नाहीत हे , गुंज (ता पालम) येथील श्री लोखंडे व श्री राऊत गुरुजींनी सिद्ध करून दाखवले.

“जि.प. शाळा लय भारी” असेच घडले या प्रयोगाचा व्हिडीओ व्हायरस झाला पण शाळा बंद होण्या पासून वाचविणाऱ्या या दोन्ही गुरुजींच्या प्रयोगाची शासन स्तरावर दाखल घेऊन स्वातंत्र्य दिनी त्याचा सत्कार व्हायला पाहिजे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button