नांदेडकृषी

Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

उस्माननगर। काटकळंबा येथे संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या सहयोगातून पशुधन पंधरवडाच्या निमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँके – नाबार्ड यांच्या सहाय्याने एकात्मिक पाणलोट प्रकल्पाच्या अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सध्या पावसाळा हंगाम असल्यामुळे वातावरणात बदल झाले आहे त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये विविध आजाराची लक्षणे जाणवू लागली आहेत, तसेचअनेक पशुमध्ये वंधत्व आढळून येत आहे या व जनावरांच्या इतर समस्या निवारण उपाययोजना करून आजरांचे निदान करणे आवश्यक होते.तसेच गावातील अनेक जनावरांना गोचीड, गोमाशी व गुद्दी येणे हा आजार पसरला होता या सर्व रोगाचे निदान व्हावे व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पशुपालकांना आधार व्हावा या उद्देशाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पशुवैद्यक दवाखाना काटकळंबा येथील वर्ग 1 चे पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवकुमार तमलूरकर, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निहाल मुल्ला व पशुवैद्यकीय कर्मचारी राठोड, सूर्यवंशी, बस्वदे आदीनीं काटकळंबा सह परिसरातील पाळीव प्राणी गाय, बैल, म्हैस, शेळ्या, गाढव व कुत्रे आदी 197 प्राण्यांची तपासणी करून उपचार केले. सदरील शिबिरात मुख्यत्वे जनावरांची आरोग्य तपासणी,वंद्यत्व निवारण, गर्भ तपासणी व उपचार, जंत निर्मूलन, गोचीड व गोमाशी निर्मूलन, हार्मोनल थेरपी, अतिसार व म्हशीमध्ये दुधाची कमतरता आदिवर उपचार, सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. फेरोस्कोपी द्वारे जनावरांच्या पोटातील धातुंचे कण शोधण्यात येऊन या पशुपालकांना ऑपरेशन चा सल्ला देण्यात आला. शिबीर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले.

या प्रसंगी काटकळंबा येथील पशुधन विकास अधिकारी यांनी पाळीव प्राण्यांचे आजार त्यांची काळजी व निगा कशी ठेवायची याचे मार्गदर्शन केले प्रसंगी जय शिवराय पाणलोट विकास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदराव वाकोरे ,वसंत जगदेवराव पानपट्टे, माधव भागानगरे, रामदास बस्वदे,संस्था कार्यकर्ते किशन जाधव व पशुपालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निहाल यांनी केले, सूत्रसंचालन गंगामणी अंबे व आभार विजय भिसे यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button