Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL
उस्माननगर। काटकळंबा येथे संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या सहयोगातून पशुधन पंधरवडाच्या निमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँके - नाबार्ड यांच्या सहाय्याने एकात्मिक पाणलोट प्रकल्पाच्या अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सध्या पावसाळा हंगाम असल्यामुळे वातावरणात बदल झाले आहे त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये विविध आजाराची लक्षणे जाणवू लागली आहेत, तसेचअनेक पशुमध्ये वंधत्व आढळून येत आहे या व जनावरांच्या इतर समस्या निवारण उपाययोजना करून आजरांचे निदान करणे आवश्यक होते.तसेच गावातील अनेक जनावरांना गोचीड, गोमाशी व गुद्दी येणे हा आजार पसरला होता या सर्व रोगाचे निदान व्हावे व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पशुपालकांना आधार व्हावा या उद्देशाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पशुवैद्यक दवाखाना क...
