HomeनांदेडBjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल...

Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

हिमायतनगर। येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज दि 13 रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरून हर घर तिरंगा अभियान च्या पार्श्वभूमीवर जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी दुचाकी घेऊन सहभागी होऊन शहरातील मुख्य रस्त्याने काढलेली रैली यशस्वी केली.

रैलीच्या सुरुवातीला येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने दुचाकी रैली काढली, यावेळी अनेकांनी हाती तिरंगा ध्वज घेतला होता. सदर रैली ही भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे, प्रदेश सचिव अरुणजी पाठक, प्रदेश सरचिटनिस युवराज पाटील चाकुरकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख, नांदेड उत्तरचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वागत आयनेनीवार.

तसेच नांदेड भाजप जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, जिल्हाचटणीस अशिषभाऊ सकवान, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, युवा मोर्चा महामंत्री स्वप्नील गरडे नगरसेवक शिवाभाऊ आंधळे, राज नाईक मा. तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हर घर तिरंगा मोटर सायकल रॅलीचे आयोजन हिमायतनगर शहरात करण्यात आले होते.

रैलीचे आयोजक भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी, रामेश्वर पाकलवाड, महेशराव अंबिलगे, वामनराव पाटील वडगावकर, संजय गोसलवाड, सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, मा. सरपंच जीवन जैस्वाल, संदीप वानखेडे, विनायक ढोणे, राजू पाटील, ज्ञानेश्वर शेवाळे, विनोद दुर्गेकर, माधव कदम, अभिलास जैस्वाल, गोविंद माने, आनंद घोसलवाड, अमोल माने, पोशेटी, सुरज चिंतावार, राम शिदे, हिदाईत खान, राम जाधव, राहुल खडके, अजय जाधव, अहमदखान पठाण, मधुकर पांचाळ, दयानंद थोटे, विकास भुसावळे, बालाजी ढोणे, शिवा नाईक, दिनेश कोरडे, लक्ष्मण तिम्मापुरे, नारायण मुद्दनवाड, प्रथमेश करेवाड, रमेश सादलवाड, कृष्णा जाधव, सुमित गोपेवाड, बालाजी शिंदे, शंकर जाधव, गंगा बच्चेवाड, अमोल सुरोशे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments