कृषीनांदेड

Cloudburst damages ; ढगफुटीमुळे सुनील सुर्यवाड यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनलसह कापुस सोयाबीन पिकाचे नुकसान

उस्माननगर l ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीत उस्माननगर ता.कंधार येथील शेतकरी सुनील जळबा सुर्यवाड यांचे जोडनदी लगत असलेल्या शेतातील सोयाबीन,कापुस ,पिकासह शक्ती कंपनीच्या सौर ऊर्जा पॅनेलचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयेचे नुकसान झाले आहे.

उस्माननगर ते नांदेड रोडवरील जोड नदीला लागून सुनील जळबा सुर्यवाड यांचे शेत आहे. दि.२८ , २९ या दोन तीन दिवस पडलेल्या ढगफुटी मुळे धोधो पावसामुळे नदीला पूर आला.आलेला पुर शेतात घुसून शेतातील कापुस, सोयाबीन पिकाच्या वर पंधरा फुट पाणी साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले.

IMG 20250902 WA0064 Cloudburst damages ; ढगफुटीमुळे सुनील सुर्यवाड यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनलसह कापुस सोयाबीन पिकाचे नुकसान
IMG 20250902 WA0065 Cloudburst damages ; ढगफुटीमुळे सुनील सुर्यवाड यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनलसह कापुस सोयाबीन पिकाचे नुकसान

त्याचबरोबर शेतातील शक्ती कंपनीचे सौर ऊर्जा पॅनल पाण्याखाली गेल्यामुळे पुराच्या पाण्याच्या वेगाच्या प्रवाहात काही प्लेट फुटले तर पाईप वाहुन गेले. ढगफुटीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याने मोठी हानी झाली आहे. शासनाने शेतातील झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लाभ मिळून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!