नांदेडधार्मिकपुणे

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा बहु मान पोटा बु येथील शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना

हिमायतनगर (अनिल मादसवार) कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांच्या मोठ्या गर्दीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या पोटा बु गावातील अल्पभूधारक शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. गेल्या विस वर्षांपासून अखंड पायी वारी करणाऱ्या या वारकरी दांपत्याला यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सपत्नीक शासकीय पूजेचा बहुमान मिळाला.

हिमायतनगर तालुक्यातील वारकरी संप्रदायामध्ये हा पहिलाच शासकीय पूजेचा मान असल्याने या दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भक्तीभावाने दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारी करणाऱ्या वालेगावकर दांपत्याने सांगितले, “गेल्या विस वर्षांपासून आम्ही विठ्ठल चरणी जात आहोत. आज कार्तिकी एकादशीला आम्हाला ‘मानाचा वारकरी’ म्हणून पुजेचा मान मिळाला. हे आमच्यासाठी विठ्ठलाचे आशीर्वाद आहे.” विशेष म्हणजे या शासकीय पूजेचा मान मिळाल्या बरोबरच राज्य सरकारतर्फे या दांपत्याला एका वर्षासाठी मोफत बस प्रवास पास देण्यात आला आहे.

573867108 793261863702386 3572179101736680710 n Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा बहु मान पोटा बु येथील शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना

ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर यांनी या वारकरी दांपत्याचे कौतुक करत म्हटले की, “हिमायतनगर तालुक्यातील वारकरी परंपरेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विठ्ठलभक्ती, संयम आणि सातत्याचे हे प्रतीक आहे.” पोटा बु गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात या वारकरी दांपत्याच्या मानाच्या पूजेबद्दल अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!