नांदेडमराठवाडा

Hadgaon city under strict lockdown | हदगाव शहर कडकडीत बंद…सामाजिक कार्यकर्ते दत्ता अंनतवार यांच्या समर्थनार्थ शहरात रँली – NNL

हदगाव, शेख चांदपाशा| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणी करिता हदगाव तालुक्यात कवाना या गावी गेल्या आकरा दिवसापासुन आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार याची मागणी शासनाने त्वरीत मान्य करावी यासाठी बुधवारी हदगाव शहराच मार्केट बंद ठेवण्यात आले होते.

सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी गेल्या ११ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र शासनाने याची साधी दाखलाही घेतली नाही. त्यामुळे सकाळ ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी हिमायतनगर बंद करून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर बुधवारी हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. यासाठी शहरातील व्यापारी नागरिकांनी बंदमध्ये सामील होऊन पाठिंबा दिल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी आभार मानले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार याची मागणी त्वरीत मान्य करावी. यासाठी बुधवारी हदगाव शहराच मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आले होत. हदगाव शहरातील व तालुक्यातील सकल ओबीसी समाजातील प्रमुख नेते यांच्यासह रामलीला मैदान ते बाबासाहेब आबेडकर चौक ते उमरखेड कार्नर तसेच जुने बस्थानक ते आबेडकर चौक पर्यंत पायी रँली काढण्यात आली. हदगाव शहरातील सकल ओबीसी समाजाच्या बंदच्या अहवानाला प्रतिसाद देत आपआपली दुकाने बंद ठेवली होती. तर आंदोलन शांतते व्हावे यासाठी पोलिसांनी पण चोख बदोंबस्त ठेवला होता.

दरम्यान सायंकाळी ओबीसी नेते दत्तात्रय अनंतवार यांचे‎ उपोषण बुधवारी ३१ जुलै अकराव्या‎ दिवशी सुटले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी‎ नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव ‎एकवटले आहेत. नीळकंठ पाटील,‎नाना गुद्धटवाड, सुशील नावडे, आनंदराव‎मस्के, राजेश फुलारे आदी सहभागी झाले.‎

मंडल आयोगाच्या सर्वेक्षणानुसार ‎सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ‎नसलेल्या, मराठा समाजाला ओबीसी ‎प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. या‎मागणीसाठी उपोषण करणारे अनंतवार‎ यांना पाठिंबा म्हणून ओबीसी‎ समाजबांधवांनी एकत्र यावे, असे‎ आवाहन यावेळी करण्यात आले.‎ यावेळी उपस्थित समाज बांधवाना ओबीसी‎नेते पी.टी.मुंडे यांनी मार्गदर्शन केले.‎ओबीसी समाजबांधवानी संविधानाने‎दिलेला हक्क वाचवण्यासाठी एकजुटीने‎लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.‎ कुणीही आरक्षणावर गदा आणू शकत‎नाही. त्यासाठी एकजूट आवश्यक आहे,‎असे त्यांनी यावेळी सांगितले.‎ 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!