Hadgaon city under strict lockdown | हदगाव शहर कडकडीत बंद…सामाजिक कार्यकर्ते दत्ता अंनतवार यांच्या समर्थनार्थ शहरात रँली – NNL
हदगाव, शेख चांदपाशा| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणी करिता हदगाव तालुक्यात कवाना या गावी गेल्या आकरा दिवसापासुन आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार याची मागणी शासनाने त्वरीत मान्य करावी यासाठी बुधवारी हदगाव शहराच मार्केट बंद ठेवण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी गेल्या ११ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र शासनाने याची साधी दाखलाही घेतली नाही. त्यामुळे सकाळ ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी हिमायतनगर बंद करून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर बुधवारी हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. यासाठी शहरातील व्यापारी ...
