धार्मिकनांदेड

Shri Durgamata Run : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिमायतनगरात श्री दुर्गामाता दौड

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौड कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

या दुर्गामाता दौडीचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य जनतेच्या मनात जागवणे तसेच देव–देश–धर्माची प्रेरणा युवकांमध्ये निर्माण करणे हा आहे.

ही दौड घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज सकाळी ५.३० वाजता कालिंका मंदिरापासून सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्याने निघून पुन्हा मंदिर परिसरात सांगता होत आहे. या वेळी सर्व शिवभक्त पांढरा कुर्ता-पायजमा, पांढरी टोपी व पदक घालून या दौड मध्ये सामील होतं असून शुभ्र वस्त्र बंधनकारक ठेवले आहे.

IMG 20250930 210458 scaled Shri Durgamata Run : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिमायतनगरात श्री दुर्गामाता दौड
Oplus_16908288

कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होतं असून, आयोजकांनी शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात उपस्थित होऊन दुर्गामाता दौडी दररोज सकाळी रामप्रसाद शहरात होत असून यामुळे परिसरात शिवसंस्कार आणि राष्ट्रभावनेचा उत्साह जागृत होणार असल्याचा विश्वास या दौडमध्ये सामील झालेल्या  युवकांनी व्यक्त केला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!