नांदेडसोशल वर्क

Sand Distribute : घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटपास सुरुवात

श्रीक्षेत्र माहूर l आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी वडसा येथे केला शासनाच्या अभिनंदनीय उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाखोच्या संख्येने मंजूर केलेले केलेल्या घरकुल योजनेच्या बांधकामासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा शासनाच्या स्वप्नपूर्ती संकल्पचा शुभारंभ आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी घरकुल लाभार्थ्यांना मौजे पडसा वडसा टाकळी येथून मोफत वाळू वाटपाच्या योजनेचा शुभारंभ केला यावेळी शासनाच्या अभिनंदनिय उपक्रमाबद्दल माहूर तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यातून अभिनंदनची लाट उसळली असून लाभार्थ्यांनी घरपोच मोफत वाळू मिळताच प्रचंड जल्लोषात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आमदार भिमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला तहसिलदार किशोर यादव यांचे आभार मानले संपुर्ण तालुक्यांतील घरकुल लाभार्थ्यांना सोमवार पासून वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे तहसिलदार किशोर यादव यांनी यावेळी सांगितले आहे

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि 8 एप्रिल व 30 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध होईल तिथून पाच बरास मोफत वाळू देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी उपलब्धतेची चाचणी करण्यात येत होती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सर्व मंडळ अधिकारी तलाठ्यांना सोबत घेऊन वाळू स्त्रोतांची पाहणी करून दि 24 रोजी मौजे पडसा येथून मोफत वाळू वाटप योजनेचा शुभारंभ केला

यावेळी आमदार भीमराव केराम यांनी लाभार्थ्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड सरपंच रुखमाबाई आरके भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के भाजपाचे अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुने उपसरपंच बाबाराव चौधरी विलास पाटील चौधरी प्रकाश दादा गायकवाड किसनराव मारबते नंदकुमार जोशी विजय आमले हर्षदीप दीक्षित कुलदीप घोडेकर आनंदा हिंगाडे निलेश तायडे अविनाश भोयर विनायक मुसळे शेख इमरान जितू चोले शेख मोईज लाभार्थी बंडू शेवाळे शेंडे शुभम भवरे यांचे सह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते यावेळी तहसीलदार किशोर यादव यांनी धडाकेबाज निर्णय घेत घरकुल लाभार्थ्यांना जिल्ह्यात पहिल्यांदा पुढाकार घेऊन वाळू उपलब्ध करून दिल्याने त्यांचा वडसा पडसा टाकळी या तिन्ही गावातील नागरिकाकडून जाहीर सत्कार करण्यात आला

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!