
नवीन नांदेड l नरोबा मंदिर देवस्थान जुना कौठा नांदेड श्रावण मास महिन्यात 25 जुलै ते 23ऑगस्ट दरम्यान दैनंदिन महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन गुरू व्यंकटेश मुळी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले असून भाविक भक्तांनी या आयोजित महाअभिषेक ,महाआरती व महाप्रसाद लाभ घेण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नरोबा देवस्थान समिती येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास महिन्या मध्ये एक महिना महाअभिषेक व दैनंदिन महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे, पहिल्या दिवशी मनपा प्रभागाचे माजी नगरसेवक राजू काळे, व आर्य वैश्य समाज यांच्या सह अनेक अन्नदाते तर श्रावण मास सांगता जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले .

मंदिरा लगत सभागृहात गोविंद सेठ मंत्री यांनी दिलेल्या टाईल्स व ग्रेनाईट यांच्या शुभारंभ 25 जुलै रोजी करण्यात येणार आहे,श्रावण मास निमित्ताने करण्यात येणाऱ्या महाअभिषेक व महाप्रसाद लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.





