महाराष्ट्रमुंबई

Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

रायगड| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे     सी  २९५ या विमान  धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी  विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई ३० या लढाऊ विमानानेही  फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी २९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळसिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. श्रीकांत शिंदेनरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, प्रशांत ठाकूरमहेश बालदीगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहलसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेविभागीय आयुक्त डॉ देशमुखरायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  सी २९५ विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते.

airoplain 1 Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

यावेळी माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे. “मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सिडको ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. या विमानतळामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होतीलतसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

airoplain 2 Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प – उपमुख्यमंत्री फडणवीस

नवी मुंबई विमानतळाचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दर वर्षी अंदाजे ९ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी-न्हावाशेवा सी लिंकमुंबई तसेच नवी मुंबई मेट्रोदोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!