Friday, May 15

Tag: Runway Test Successful Boosting Maharashtra’s Progress

Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र, मुंबई
रायगड| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे     सी - २९५ या विमान  धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी  विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई ३० या लढाऊ विमानानेही  फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी २९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. ...
error: Content is protected !!