कृषीनांदेड

Farmers deprived of crop loans due ” बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित -NNL

देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शेतकऱ्यांनी दिलेले प्रस्ताव धूळखात पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. येथील आयडीबिआय बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित असल्याने बँकेचे उबरवटे झिजत आहेत.

खरीप हंगामात ग्रामीण भागातील शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन पिकांच्या देखभालीसाठी आर्थिक मदत म्हणून बँकांकाढून मिळणारे कृषी कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक एकरी प्रमाणे पिक कर्ज उपलब्ध करून खरीपाच्या पिकाची फवारणी कोळपणी, निंदणी करुन पिकाची देखभाल करतात. मात्र शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन बँकेकडे पिक कर्जाची मागणी केली असता जणू काय..? सोयाबीन खळे करायच्या वेळी हातात रक्कम मिळते की नाही…? असा सवाल शेतकऱ्यांना पडतो आहे.

पिक कर्ज उपलब्ध करून देणारे अधिकारी सुट्टीवर गेल्याने त्यांच्या जागेवर अधिकारी मागवून शेतकऱ्यांना पिक कर्जाची लवकरात लवकर उपलब्धता करून देणे अत्यंत गरजेचं आहे. असे असताना अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने जवळपास महिनाभर या भागातील शेतकरी बँकेकडे चकरा मारत आहेत. बँक व्यवस्थापक हे बँकेचे नोकर चाकर असून, जणू काही बँक घरची असल्याच्या तोरात वागतात. तसेच पिक कर्जाची नुतनीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावून तूम्ही रक्कम भरुन टाका तुम्हाला दोन दिवसांत खात्यांवर रक्कम जमा करण्याचे सांगतात.

यानंतर तरी कर्ज मिळेल अशी अपेक्षा धरून शेतकऱ्यांनी अगोदरच किडूकमिडूक विकुन खरीपाच्या पिकाची पेरणी केली. जवळ कृषी कर्ज खाते नुतनीकरण करण्यासाठी रक्कम नसल्याने सावकारा पासून शेजारच्या जवळून तीन चार रूपये व्याजाने रक्कम उचलून बँकेत जमा केली. मटार त्यानंतर शेतकरी कर्जासाठी बैंकांच्या चकरा मारून चपला झिजून हैराण झाले, मात्र कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रक्कम नाही दिल्यास आत्महत्या करण्याची वेळ आली होती. शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी केली की पैशासाठी अठरा विश्व दरोदारी होतों यांची जाणीव आयडीबीआय बँकेच्या मुजोर व्यवस्थापकांना नाही काय..? असा सवाल शेतकऱ्यांना पडतो आहे. तेव्हा वरिष्ठांनी यांची दखल घेऊन लवकरात लवकर उचलबांगडी करण्यात यावी अन्यथा जनता मोर्चाच्या तयारीत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button