नांदेड| झेन्सीन ओकिनावा गोजू-रिओ कराटे डो फेडरेशन ऑफ इंडिया व नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंना बेल्ट वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा शिंदे प्रमुख पाहुणे हवालदार मेजर राघोजी मोळके 56 बटालियन सीमा सुरक्षा बल सेवानिवृत्त सचिव एकनाथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या शुभहस्ते सेन्साई चोजण मियागी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यामध्ये येल्लो बेल्ट स्पंदन सांगवे, श्राव्या महाजन, काव्य महाजन, रोशनी कांबळे ,श्रावणी मस्के ,जयती कांबळे, युवराज हंबर्डे, अनुज हराळे ,अनन्या कांबळे ,अजिता कांबळे ,आरोशी कंधारे स्वरा स्वामी, ऑरेंज बेल्ट सजक संगमवार, नव्या सोनकांबळे, मयुरी गजभारे ,स्नेहा पप्पुलवाड, श्रीनिवास कदम ,देवयानी सोनकांबळे , सायली सोनकांबळे, ग्रीन बेल्ट आर्यन जेसू, श्रेयश गजले, मृणाल मोतेकर ,राजनंदिनी डोंगरे, सोहम जोंधळे, ब्ल्यू बेल्ट युवराज गोडबोले ,स्वरा बच्चेवार, अंजली गोडबोले, प्रणिता वारकड, ब्राऊन बेल्ट सोनाक्षी कुंटे, ब्राऊन1 सृष्टी गायकवाड, सुयेशा क्षीरसागर मानीनी यांना बेल्ट वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक पाहून अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल कंदुलवार प्रणव वारकड यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयेशा क्षीरसागर यांनी केले.