नवीन नांदेड| सिडको परिसरातील प्रसिद्ध असलेल्या लोंढे पाटील यांचे हॉटेल छ्त्रपतीच्या वतीने अंनत चतुर्थी निमित्ताने सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी अनेक भाविक भक्तांना मोफत चहाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली, यावेळी या उपक्रमाचे परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी स्तुती करून अभिनंदन केले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंनत चतुर्थी निमित्ताने सिडको परिसरातील मुख्य मार्गावर असलेल्या श्री विसर्जन सोहळा बघण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना लोंढे पाटील यांच्या छत्रपती हॉटेल यांच्या वतीने अल्प कालावधीत लोकप्रिय झालेल्या एल पी चहाचे मोफत वाटप १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले,माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,युवा नेते संजय पाटील घोगरे, उदय देशमुख ,नांदेड दक्षिण शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर,पत्रकार रमेश ठाकूर,यांचा हस्ते या मोफत चहाचा शुभारंभ करणयात आला.
यावेळी पोलीस कर्मचारी,महिला पोलीस,होमगार्ड यांच्या सह महिला , युवक,पुरुष,नागरीक व भाविक भक्तांना मोफत चहा देण्यात आली. हॉटेल मालक एकनाथ पाटील लोंढे, विश्वनाथ लोढे, रूस्तुम पाटील लोंढे, बालाजी लोंढे व तिरूपती लोंढे यांनी हा उपक्रम राबविला तर यासाठी वस्ताद अर्जुन बेटकर,अप्पा, अन्नपूर्णा पवार व विशेष मित्र परिवार यांनी सहकार्य केले. गेल्या अनेक वर्षांपासून लोंढे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत हे कार्य चालुच आहे,जवळपास अकरा हजार नागरीकांनी या एल पी चहाच्या अस्वाद घेतला.