क्राईमनांदेड

Ganja seized in Tireboard Ganganagar Nanded । पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हाद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रुपयाचा 24.610 किलो गांजा जप्त -NNL

नांदेड। नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे कामी मा. पोलीस अधिक्षक श्री कोकाटे साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हाद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रुपयाचा 24.610 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील सपोनि श्री संतोष शेकडे यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. यावरून श्री संतोष शेकडे, सपोनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 26/07/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री के. बि. डांगे, नायब तहसीलदार नांदेड, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड, शासकिय पंच व पोलीस अमलदार यांचे सह टायरबोर्ड गंगानगर नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याची मिळालेल्या माहीती प्रमाणे सदर ठिकाणी छापा मारला.

यावेळी अहेमदखान अनवरखान वय 28 वर्षे व्यवसाय मिस्त्री काम रा. गंगानगर टायरबोर्ड नांदेड ता. जि. नांदेड यास पकडुन त्यांचे घरातुन एकुण 24.610 किलो गांजा किमंती 4,92,200/- रुपयाचा जप्त करण्यात आला. आरोपीस पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे हजर केले असुन सपोनि श्री संतोष शेकडे यांचे फिर्याद वरुन वरील एका आरोपी विरुध्द पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि संतोष शेकडे, पोलीस अमलदार गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संभाजी मुंडे, किशन मुळे, बंडु कलंदर, तानाजी येळगे, मोतीराम पवार, राजु बोधगीरे, शेख इजाईल, अनिल बिरादार, अकबर पठाण, शिवाजी बिचकुले, महीला अमलदार किरण बाबर, चालक अमलदार दादाराव श्रीरामे, हानुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button