नांदेडधार्मिक

Organized mass Monday : हायटेक सिटी येथे सामुहिक सोमवार शिवरात्र आणि प्रदोष उद्यापन सोहळ्याचे आयोजन

नांदेड| भारतीय संस्कृतीमध्ये अनादि काळापासून व्रत्त, वैकल्य, उपासना ( Organized mass Monday) यांना अनन्य साधारण महत्व आहे. व केलेल्या व्रत वैकल्याचे विधीवतपणे उद्यापन केल्याने त्या व्रताचे योग्य ते फळ प्राप्त होते.

त्याबद्दल सोमवार, शिवरात्र, प्रदोष या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व सांगितले आहे. श्री. ष. ब्र.108 सोमलिंग शिवाचार्य महास्वामीजी, बिचकुंदा (तेलंगणा) यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या कृपा आशिर्वादाने तथा श्री शिवयोगी मन्ना महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने शके 1946 पौष कृष्णपक्ष त्रयोदशी दि. 27 जाने 2025 सोमवारी सायंकाळी 4 ते 6.30 या प्रदोष काली या शुभ मुहुर्तावर स्थापित श्री हरी हरेश्वर महादेवांच्या सानिध्यामध्ये स्थापित मंडळांच्या पुजनानी हवनच्या यज्ञानी उद्यापन सोहळा हायटेक सिटी, संकेत हॉस्टेल ते आसना चौक रोड, सांगवी (बु), नांदेड येथे संपन्न होणार आहे.

जास्तीत जास्त शिवभक्त मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे असे आवाहन हायटेक सिटी येथील शिवमंदीराचे मुख्य पुजारी तथा आयोजक श्री वे.मु.एकनाथ महाराज भायेगांवकर यांनी केले आहे. भव्य सोहळ्यासाठी विशेष सहकार्य हे श्री दिनेशकुमार धुत व सर्व हायटेक सिटी परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button