नांदेडनागपूरनाशिकमहाराष्ट्र

Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

नागरिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराला फोनवरच सुनावलं
कोट्यवधींचे काम पण दर्जा शून्य! नाली की दिखावा?
हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या कामाचा दर्जा वादात..!

हिमायतनगर (अनिल मादसवार ) शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिमेंट काँक्रेटच्या कामावर मजबुतीसाठी आवश्यक असलेले क्युरिंगचे पाणी टाकले जात नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नियमाप्रमाणे रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूंना समान रुंदीवर नाली बांधकाम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी नाली रस्त्याच्या अगदी जवळ तर काही ठिकाणी दूर बांधण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बांधकामापूर्वी योग्य बेस न करता थेट चार इंच थातूर माथुर काँक्रेट टाकून काम उरकण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

IMG 20260306 181434 Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
Oplus_16908288

यामुळे नालीच्या भिंतींमध्ये आवश्यक त्या प्रमाणात गज व साहित्याचा वापर न झाल्याने कामाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. काही ठिकाणी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडले असून तर काही ठिकाणी नालीचे स्लॅब उलले जात असल्याचेही दिसून आले आहे.

IMG 20260306 181444 Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
Oplus_16908288

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी प्रत्यक्ष नाल्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरला दूरध्वनीवरून चांगलेच धारेवर धरत “काम करायचे असेल तर दर्जेदार काम करा, अन्यथा काम तात्काळ बंद करा,” असा कडक इशारा दिला. तसेच या संदर्भाची तक्रार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

IMG 20260306 181627 Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
Oplus_16908288

या पाहणीवेळी परिसरातील नागरिक व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील कोट्यवधी रुपयांच्या या नाली व रस्ता बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“गेल्या महिनाभरापासून हिमायतनगर शहरात नालीचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, मात्र या कामाकडे शहरातील एकाही पुढाऱ्याने लक्ष दिलेले दिसत नाही. संबंधित गुत्तेदारावर आजी-माजी आमदार किंवा खासदार यांचीही कोणतीही वचक दिसत नाही. इतकेच नव्हे तर या कामावर संबंधित अभियंताही फिरकत नसल्यामुळे नालीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.

IMG 20260306 181504 Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
Oplus_16908288

अशा परिस्थितीत नालीच्या बाजूला एखाद्या नागरिकाने घराचे बांधकाम सुरू केले आणि त्या ठिकाणी जड मटेरियल घेऊन येणारे वाहन आले तर ही नाली दबून फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बोगस कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि दर्जेदार पद्धतीने काम करून द्यावे,” — वामनराव पाटील वडगावकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!