Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
नागरिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराला फोनवरच सुनावलं
कोट्यवधींचे काम पण दर्जा शून्य! नाली की दिखावा?
हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या कामाचा दर्जा वादात..!
हिमायतनगर (अनिल मादसवार ) शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिमेंट काँक्रेटच्या कामावर मजबुतीसाठी आवश्यक असलेले क्युरिंगचे पाणी टाकले जात नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नियमाप्रमाणे रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूंना समान रुंदीवर नाली बांधकाम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी नाली रस्त्याच्या अगदी जवळ तर काही ठिकाणी दूर बांधण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बांधकामापूर्वी योग्य बेस न करता थेट चार इंच थातूर माथुर काँक्रेट टाकून काम उरकण्याचा प्रयत्न केल्या जात ...
