मुंबईराजकीय

Kha. Ashok Chavan ; खा. अशोक चव्हाणांनी घेतली इराण दुतावास अधिकाऱ्यांची भेट – NNL

मुंबई l हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे अभियंते योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता असल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील इराणचे कॉन्सुलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांची भेट घेतली.

खा. चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी इराणी दुतावासात जाऊन मोहिसनेफार्द यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, गेल्या ५ डिसेंबरपासून योगेश पांचाळ बेपत्ता असून, त्यांचे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी इराणमधील संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहेत. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

या पार्श्वभूमिवर इराणच्या मुंबईतील कॉन्सुलेट अधिकाऱ्यांनी इराण सरकार व तेथील तपास यंत्रणांशी समन्वय साधून योगेश पांचाळ यांचा तातडीने शोध घ्यावा,अशी विनंती माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी इराणचे कॉन्सुलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांना केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button