HomeनांदेडHadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात 'टक्के' वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

विद्यमान आमदारांनी लक्ष दियाव नागरिकाची अपेक्षा

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात गावपातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होतांना दिसुन येत आहेत. काही कामे शासनमान्य कञांटदाराच्या नावे असली तरी राजकीय नेत्याचे चेलेचपाटे कामे करित असल्याने रोडच्या कामाचा दर्जा टक्केवारीमुळे सुमार झालेला दिसून येत आहे. या बाबतीत संबंधित विभागाला होणा-या कामाच्या बाबतीत बोर्ड लावण्यासंबधी काही जागरुक नागरिकांनी लेखी पञाद्वरे कळविलेले असतांना ही प्रशासनाने त्याची साधी दखल घेतलेली नसल्याचे दिसुन येत आहे.

कञाटदाराच्या नावे राजकीय नेत्याचे जवळचे काही कार्यकर्ते हे काम करित असल्याने सा.बा विभाग व नगरपरिषद प्रशासन माञ ह्या कामाचा दर्जा न पाहता त्यांची बीले पास करतांना दिसुन येत आहे. रोडच्या कामाची गुणवत्ता ढासळेली आसतांना या बाबतीत हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर ह्यानी लक्ष घालावे. शासनाच्या होणा-या निधीचा चागल्या दर्जाच्या कामाला उपयोगी व्हावा असे साकडे विद्यमान आमदाराकडे नागरिक घालत आहेत. हदगाव शहरात काही प्रभागात नवीन रोडच्या बाबतीत कहरच झालेल दिसुन येत आहे. ज्या प्रभागात नागरिक दोन दशका पासुन नवीन रोडपासुन वंचित आहे आश्या प्रभागात न टाकता केवळ ज्या ठिकाणी नवीन वस्ती नव्या बिल्डिंगच्या प्रतिष्ठाच्या विशिष्ट भागात रोड टाकण्यात आलेली आहेत.

या बाबतीत न.पा. चे मुख्यधिकारी यांना या बाबतीत विचारणा केली असता ते पण योग्य उत्तरे देवू शकलेले नाही. केवळ निधी कसा कसा खर्च करायच हेच ध्येय दिसुन येत असल्याने नालीचे सांडपाणी रोडची उंची या बाबतीत काहीच ताळमेळ लागत नाही. यामुळे शहरात व तालुक्यात होत असलेल्या नव्या रोडची वाट लागल्याचे दिसुन येत आहे. हदगाव शहरात काही महीण्यापुर्वी एका कञाटदाराच्या नावे भलत्याच कार्यकर्त्यांने रस्ते व नालीचे कामे केलेले आहे. जर या कामाचे अवलोकन केले तर कामाची गुणवत्ता पाहीले असता शासनाच्या निधीच कसा दुरुपयोग करण्यात आलेला आहे हे दिसुन येत आहे.

शहरात व तालुक्यात गेल्या अनेक महीण्या पासुन विकास कामे जोरात सुरु आहेत. कामाच्या दर्जा बाबतीत माञ काही लोकप्रतिनिधी पण ‘मौण ‘पाळुन आहेत. या बाबतीत माहीती घेतली असता नादेड जिल्ह्यातील अमुक -तमूक नेत्याच्या जळवच्या लोकांची कामे आहेत अशी माहीती मिळाली. शहरात व तालुक्यात लाखो करोडो रुपयाचे कामे शासनाच्या कोणत्या योजना अतर्गत आहेत. त्या बहुतांशी कामावर सुचना फलक का..? नाहीत या बाबतीत संबंधित विभागाकडे तोडी लेखी स्वरुपात निवेदन देण्यात येवून ही संबंधित विभाग का..? दखल घेत नाही. हे स्थानिय प्रशासन नेमके ऐकते तारी कुणाच..? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

हदगाव विधानसभा क्षेञाचे आ.माधवराव पा.जवळगावकर हे पहील्या टर्ममध्ये त्यांचा थेट संबध शहरातील व तालुक्यातील नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिय पञकार यांच्याशी येऊन हितगुज करायचे. विकासाच्या बाबतीत ही चर्चा करायचे परंतु अलिकडच्या काळात इतक्या राजकीय घडामोडी होत असताना माञ त्यांची भेट दुर्मिळ झालेली आहे. हदगाव तालुक्यात काही काही मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गंभीर तक्रारी आहेत. या कामी त्याची प्रशासकीय स्थानिक पातळी आढावा बैठक अपेक्षित आहे अशी नागरिकात मागणी होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments