नांदेड| भारतीय जनता पक्ष प्रणीत राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नव्यानेच निवड झाली असून ही कार्यकारिणी विभागीय नियंत्रकांकडे सपूर्द करतांनाच एसटी कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवा अशी आग्रही मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.


सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गेल्या महिन्यात निवड करण्यात आली. त्यानंतर विभागीय नियंत्रकांशी पहिल्यांदाच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांचा भडीमार अधिकाऱ्यांवर केला. कामगारांचे जे कांही प्रलंबित प्रश्न आहेत. ते तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

विभागीय नियंत्रकांशी भेटलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण साले, विभागीय मुख्य सल्लागार संतोष पांडागळे, उपाध्यक्ष श्रीमती पद्मश्री राजे, विभागीय सचिव संदीप जेटी, कोषाध्यक्ष अशोक वजिरगावे, नांदेड आगार सचिव राजू घागरदरे, अध्यक्ष गंगाधर वाघमारे यांच्यासह नांदेड विभागातील अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
